भित्तीकेच्या जाडीनुसार खालीलपैकी कोणता चढता क्रम बरोबर आहे?
धमण्या < शिरा < केशवाहिन्या
शिरा < धमण्या < केशवाहिन्या
शिरा < केशवाहिन्या < धमण्या
केशवाहिन्या < शिरा < धमण्या √
मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात?
९७००० √
९७५००
१००००
१०५००
माणूस जेव्हा उच्छ्वास सोडतो, तेव्हा उच्छ्वासित हवेतमध्ये _ _ _ टक्के कार्बन डाय ऑक्साईड असतो.
०.०३ %
४.४ % √
३.३ %
५.५ %
साधारणतः मानवी दात खालीलपैकी कोणत्या सूत्राने दर्शवितात?
२ : १ : २ : ३ √
१ : २ : १ : ३
४ : १ : ४ : २
२ : १ : २ : ४
पिण्याच्या पाण्यात फ्लुओरीनचे प्रमाण _ _ _ _ पेक्षा जास्त झाल्यास डेन्टल फ्लुरोसिस हा रोग होतो.
०.२ ppm
०.८ ppm √
०.४ ppm
०.६ ppm
रक्तदाब हा —– उपकरणाने मोजला जातो.
बॅरोमीटर
स्टेथोस्कोप
थर्मामीटर
स्फीग्मोमॅनोमीटर √
मानवी शरीरातील यकृत ही _ _ _ _ ग्रंथी आहे?
अंतःस्रावी
बाह्यस्रावी √
यापैकी नाही
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत असून तिचे वजन सुमारे किती असते?
1.5 √
2.5
3.5
यापैकी नाही
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत शरीराच्या कोणत्या बाजूला असते?
डाव्या
उजव्या √
मधोमध
यापैकी नाही
मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे?
अवटू ग्रंथी √
पियुशिका ग्रंथी
अधीवृक्क ग्रंथी
यापैकी नाही
स्पष्टीकरण
अवटु ग्रंथि / थायरॉईड ग्रंथी सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात थायरॉईड कार्टिलेजच्या खाली स्थित असते
मानवी शरीरातील मुख्य ग्रंथी _ _ _ _ आहे?
अवटू ग्रंथी
अधिवृक्क ग्रंथी
उरोधिष्ट ग्रंथी
पियुशिका ग्रंथी √
मानवी शरीरातील स्वादुपिंड _ _ _ _ ग्रंथी आहे?
अंतःस्रावी
बाह्यस्रावी
वरील दोन्ही *
यापैकी नाही
स्पष्टीकरण
स्वादुपिंड ग्रंथी ही मानवी शरीरातील अंतःस्रावी ग्रंथी आणि बाह्यस्रावी ग्रंथी आहे.
बीजांडकोष ग्रंथी खालीलपैकी कोणामध्ये आढळते
स्त्री √
पुरुष
वरील दोन्ही
यापैकी नाही
वृषण ग्रंथी खालीलपैकी कोणामध्ये आढळते
स्त्री
पुरुष √
वरील दोन्ही
यापैकी नाही
मानवी शरीरातील दुसरी सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे?
यकृत
मोठे आतडे
वक्षस्थळ
स्वादुपिंड √
मानवी शरीरातील खालीलपैकी कोणती ग्रंथी आयोडीन साठवते?
पॅराथायरॉइड
थायरॉईड √
पिट्यूटरी
अधिवृक्क
थायरॉइड ग्रंथीमध्ये खालीलपैकी कोणत्या पेशी कमी जास्त प्रमाणात असतात?
फॉलीकुलर 【Folicular】
पॅरा-फॉलीकुलार 【Para-Folicular】
वरील दोन्ही √
फक्त पर्याय 2
जागतिक थायरॉईड दिवस जगभरात कोणत्या दिवशी साजरा केला जातो
25 एप्रिल
25 मे √
25 जून
25 जुलै
स्पष्टीकरण
25 मे दरवर्षी जगभरात जागतिक थायरॉईड दिवस साजरा केला जातो. लोकांना थायरॉईड विषयी जागरूक करण्यासाठी हा विशेष दिवस साजरा केला जातो. लोकांना जागरूक करण्यासाठी अमेरिकन थायरॉईड असोसिएशन व युरोपियन थायरॉईड असोसिएशन यांनी 2008 मध्ये पहिल्यांदा जागतिक थायरॉईड दिवस साजरा केला.
मानवी शरीरातील ग्रंथी जी विकरे आणि संप्रेरके दोन्ही स्रवते ती कोणती आहे?
यकृत
स्वादुपिंड √
लाळ ग्रंथी
पियुषिका
मानवी शरीरातील पिनल/पिनियल ग्रंथीमधून _ _ _ _ संप्रेरक स्त्रावते?
डोपॅमाईन
मेलॅटॉनिन √
थायरोट्रोपीन
यापैकी नाही
स्पष्टीकरण
या ग्रंथी मधून मेलॅटॉनिन संप्रेरक स्त्रवते.संप्रेरक सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी झाल्यानंतर स्रवण्यास सुरुवात होते म्हणूनच आपल्याला झोप येते.
_ _ _ _ ही मानवी शरीरातील सर्वात लहान अंतःस्त्रावी ग्रंथी आहे
पियुषिका ग्रंथी √
अधिवृक्क ग्रंथी
वृषण ग्रंथी
यापैकी नाही
स्पष्टीकरण
पियुषिका ग्रंथी 【Pitutary Gland】 ही सर्वात लहान अंतःस्त्रावी ग्रंथी असून आपल्या शरीरात मेंदूमध्ये आढळते. या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असे म्हणतात.
मानवी शरीरातील थायरॉईड ग्रंथीमधून _ _ _ _ _ संप्रेरक स्त्रवत असते.
थायरॉक्झीन
ट्रायआयोडो थायरॉनॊईन
फक्त पर्याय 1
फक्त पर्याय 2
पर्याय 1 व 2 √
स्पष्टीकरण
ही ग्रंथी आपल्या शरीरात गळ्याच्या खालील भागात श्वसननलिकेच्या तोंडावर असते. या ग्रंथीमधून थायरॉक्झीन (Thyroxine) आणि ट्रायआयोडो थायरॉनॊईन (Tri-iodo-Thyronoine) नावाचे संप्रेरक स्त्रवत असते.
_ _ _ _ _ या संप्रेरकांमुळे मानवी शरीराच्या रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण वाढविण्यास मदत होते.
डोपॅमाईन
मेलॅटॉनिन
थायरॉक्झीन
पॅरा थायरॉईड √
स्पष्टीकरण
पॅरा थायरॉईड संप्रेरकांमुळे आपल्या शरीरात रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण वाढविण्यास मदत केली जाते.
मानवी शरीरातील लाळ ग्रंथी _ _ _ _ _ ग्रंथी आहे
अंतःस्रावी
बाह्यस्रावी √
वरील दोन्ही
यापैकी नाही
स्पष्टीकरण
या ग्रंथी घशामध्ये आढळतात. या ग्रंथीतुन लाळ स्रवली जाते. तसेच अमायलेज/टायलिन नावाचे विकर स्त्रवले जाते. त्या विकरामुळे पिष्टमय पदार्थांचे विघटन होऊन माल्टोजमध्ये रूपांतर केले जाते. लाळ ग्रंथीचे कर्णमूल ग्रंथी, अधोहनू ग्रंथी आणि अधोजीव्हा ग्रंथी हे तीन प्रकार पडतात.
मानवी शरीरातील लाळ ग्रंथीचे एकूण किती प्रकार पडतात
दोन
तीन √
चार
यापैकी नाही
स्पष्टीकरण
लाळ ग्रंथीचे कर्णमूल ग्रंथी, अधोहनू ग्रंथी आणि अधोजीव्हा ग्रंथी हे तीन प्रकार पडतात.
खालीलपैकी कोणत्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत?
घाम ग्रंथी 【Sweat Gland】
लाळ ग्रंथी 【Salivary Gland】
सस्तनी ग्रंथी 【Mammary Gland】
यापैकी नाही √
स्पष्टीकरण
घाम ग्रंथी , लाळ ग्रंथी , सस्तनी ग्रंथी या बाह्यस्रावी ग्रंथी आहेत
खालीलपैकी कोणत्या बाह्यस्रावी ग्रंथी आहेत?
पिनल ग्रंथी 【Pineal Gland】
थायरॉईड ग्रंथी 【Thyroid Gland】
यकृत ग्रंथी 【Liver Gland】
यापैकी नाही √
स्पष्टीकरण
पिनल ग्रंथी , थायरॉईड ग्रंथी , यकृत ग्रंथी या मानवी शरीरातील अंतःस्त्रावी ग्रंथी आहेत
मानवी शरीरातील जठर ग्रंथीतुन खालीलपैकी कोणती संप्रेरके स्रवतात.
न्यूरोपेप्टाइड
हिस्टॅमाईन
सोमॅटोस्टॅटिन
वरील सर्व √
स्पष्टीकरण
» न्यूरोपेप्टाइडमुळे आहारात वाढ होते.
» सोमॅटोस्टॅटिनमुळे मृदू स्नायूंचे आकुंचन तसेच आतड्यातील रक्तप्रवाह नियंत्रित केला जातो.
» हिस्टॅमाईनमुळे गॅस्ट्रिक आम्लचे स्रवण नियंत्रित केले जाते.
यकृत ग्रंथीच्या हिपॅटोसाईट्स पेशीतून खालीलपैकी कोणती संप्रेरके स्रवतात.
सोमॅटोमेडीन
थ्रोम्बोपायोटिन
हेपसिडीन
वरील सर्व √
स्पष्टीकरण
» सोमॅटोमेडीन संप्रेरकामुळे पेशींची वाढ आणि विकास नियंत्रित केला जातो.
» थ्रोम्बोपायोटिन मुळे रक्तपट्टिकांच्या निर्मितीत मदत केली जाते.
» हेपसिडीनमुळे लोह क्षाराचे अवशोषण वाढते.
स्वादुपिंड ग्रंथीतील _ _ _ पेशी इन्सुलिन तर _ _ _ पेशी ग्लुकॅगॉन व सोमॅटोस्टॅटिन संप्रेरके स्त्रवतात.
स्टॅटिन , मेडीन
बीटा , अल्फा √
पिनल , डोपाईन
वरील सर्व
स्पष्टीकरण
स्वादुपिंड ग्रंथी आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स या ऊतींपासून बनलेली असते. ही ग्रंथी अंतःस्त्रावी तसेच बाह्यस्त्रावी आहे. या ग्रंथीतील बीटा पेशी इन्सुलिन नावाचे संप्रेरक स्त्रवतात. तर अल्फा पेशी ग्लुकॅगॉन तसेच सोमॅटोस्टॅटिन नावाचे संप्रेरके स्त्रवतात.
मानवी शरीरातील वृक्क ग्रंथीमधून _ _ _ _ व एरिथ्रोपायोटीन, कॅल्सीट्रायॉल संप्रेरके स्त्रवतात?
टॅनिन
डोपाईन
रेनिन √
यापैकी नाही
स्पष्टीकरण
» एरिथ्रोपायोटीनमुळे तांबडया रक्तपेशींची निर्मिती वाढविली जाते.
» कॅल्सीट्रायॉल हे जीवनसत्व D-3 चे एक स्वरूप असून त्यामुळे कॅल्शिअम आणि फॉसफरस यांचे अवशोषण वाढविले जाते.
अंडाशय ग्रंथीमधून _ _ _ _ व _ _ _ _ ही संप्रेरके स्त्रवतात?
प्रोजेस्टेरॉन
टेस्टोस्टेरॉन
इस्ट्रोजन
पर्याय 1 व 3 √
पर्याय 1 व 2
स्पष्टीकरण
» प्रोजेस्टेरॉनमुळे स्त्रियांमध्ये मासिकपाळी,
अंडपेशी,प्रसूती व दुग्धनिर्मिती क्रिया नियंत्रित होतात
» इस्ट्रोजनमुळे स्त्रियांमध्ये शारीरिक परिपक्वता तसेच गुणधर्म निर्माण होतात.
» टेस्टोस्टेरॉन संप्रेरक वृषण ग्रंथीतुन स्त्रवते
राष्ट्रीय अवयव व उती प्रत्यारोपण संस्थेअंतर्गत राष्ट्रीय जैव पदार्थ केंद्राची स्थापना कोठे करण्यात आली?
नवी दिल्ली √
पुणे
हैद्राबाद
बंगळुरु
प्रौढ मानवी शरीरात एकूण _ _ _ _ _ हाडे 【Bones】 असतात?
२७०
२०६ √
३०६
२०४
_ _ _ _ या द्रव्यामुळे विरंजक चूर्णला 【Bleeching Powder】 त्याचा गुणधर्म प्राप्त होतो.
कॅल्शियम
क्लोरीन √
ऑक्सिजन
नवजात ऑक्सिजन
स्पंज खालीलपैकी कोणत्या जीवशास्त्रीय संघाचे उदाहरण आहे?
संघ प्रोटोझोआ
संघ पोरिफेरा √
संघ सिलेंटइँटा
संघ प्लॅटिहेलमेथीस
खालीलपैकी कोणतया तापमानासाठी सेल्सिअस व फॅरनहीट स्केल सारखे असतात.
– 273
– 32
40
– 40 √
एल.पी.जी. (LPG) मध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात?
ब्युटेन व मिथेन
मिथेन व इथेन
ब्युटेन व आयसोब्युटेन √
फक्त मिथेन
विरळ माध्यमातुन घन माध्यमात जाताना प्रकाश किरणांचा मार्ग वक्र होतो, या वैशिष्ट्याला प्रकाशाचे—- म्हणतात.
अपस्करण (Dispersion)
अपवर्तन (Refraction) √
विकीरण (Scattering)
परावर्तन (Reflection)
दुपारपेक्षा पहाटे ध्वनी लांब अंतरावरुन स्पष्टपणे ऐकून येतो कारण – ― ―
दुपारपेक्षा पहाटे हवेमध्ये आर्द्रता जास्त असते.
दुपारपेक्षा पहाटे हवेचा दाब कमी असतो.√
दुपारपेक्षा पहाटे हवेत आर्द्रता कमी असते.
यापैकी नाही
टीप :- उत्तराचा पर्याय या 【√】 चिन्हांने दर्शविला आहे





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!